२० कोटी रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील केहऱ्हाळा जि. प. सर्कल मधील विविध गावात काम पूर्ण झालेले जवळपास २० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण व नवीन कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला.

वरुड, पिंपळगाव पेठ, गव्हाली तांडा, गव्हाली, तलवाडा, निल्लोड, बोरगाव कासारी, केन्हाळा, बाभूळगाव, भायगाव वरखेडी, कायगाव, बनकीन्होळा या गावात हा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला. लोकार्पण केलेल्या कामांमध्ये निल्लोड येथे मंडळ अधिकारी कार्यालय व निवास्थान, कायगाव येथील महसूल अधिकारी कार्यालय व निवास्थान, पिंपळगाव पेठ येथील ग्रामपंचायत कार्यालय ईमारत व व्यापारी संकुल, वरुड, केन्हाळा, निल्लोड, पिंपळगाव पेठ, भायगाव वरखेडी, कायगाव या गावात सामाजिक सभागृह तसेच विविध गावात सिमेंट व डांबरी रस्ते, स्मशानभूमी शेड
बांधकाम, पेव्हर ब्लॉक, नवीन डीपी इत्यादी पायाभूत मूलभूत कामांचा समावेश आहे. 

या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, सुखदेव जाधव, हनिफ मुलतानी, अक्षय मगर, पांडुरंग जैवळ, जमीर मुलतानी, कुणाल सहारे, निजाम पठाण आदींसह विविध गावातील सरपंच गावकरी उपस्थित होते.